ग्रॅमी स्मिथ आता नव्या भूमिकेत, क्रिकेट साऊथ आफ्रिकाकडून मोठी घोषणा

1724

द. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ हे आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. क्रिकेट साऊथ आफ्रिकाकडून तशी घोषणा करण्यात आली आहे. ग्रॅमी स्मिथ आता क्रिकेट साऊथ आफ्रिकेचे संचालक म्हणून कारभार बघणार आहेत. यामुळे द. आफ्रिका संघात पुन्हा नवा जोश पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ग्रॅमी स्मिथ हे एक अत्यंत अनुभवी, यशस्वी कर्णधार असून तगडे फलंदाज होते. स्मिथने 117 कसोटी सामने खेळताना 9265 धावा आपल्या नावावर केल्या. कसोटीमध्ये त्यांनी 27 शतक ठोकले होते. कसोटीमध्ये आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या तिघांमध्ये स्मिथ यांचे नाव आहे. जबरदस्त कामगिरीमुळे त्यांना मेलबर्न क्रिकेट क्लबचे सदस्यत्व देखील मिळाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या