अमित शहांऐवजी माजी आमदाराने गायले काँग्रेसचे गोडवे, उपस्थितांमध्ये पिकली खसखस

3541

गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस आमदारांच्या स्वागतासाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात 5 नेत्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. मात्र यादरम्यान एक किस्सा झाला आणि यामुळे आयोजकांची तारांबळ उडाली आणि उपस्थितांमध्ये खसखस पिकली. स्वागत समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याऐवजी एका माजी आमदाराने चक्क काँग्रेसचे गोडवे गायले.

गुजरातमध्ये काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये आलेल्या आठ आमदारांपैकी 5 माजी आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जीतू चौधरी, प्रद्युम्न सिंह जाडेजा, जे वी काकड़िया, अक्षय पटेल आणि बृजेश मेरजा यांनी भाजप सदस्यत्वाची शपथ घेतली. मात्र यादरम्यान जितू चौधरी यांची जीभ घसरली आणि त्यांनी अमित शहा ऐवजी गुजरात काँग्रेस अध्यक्ष अमित चावडा यांचे आभार मानले. यामुळे गोंधळ उडाला.

जितू चौधरी यांना उपस्थित सदस्यांनी चूक लक्षात आणून दिली. यानंतर त्यांनी आपली चूक सुधारली आणि अमित शहा यांचे आभार मानले. जितू चौधरी यांच्यासह मार्चमध्ये काँग्रेसचा राजीनामा दिलेले प्रवीण मारू यांनी काँग्रेसचे गुणगान गायले.

आपली प्रतिक्रिया द्या