माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1984 च्या शीख दंगलप्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे गुरुवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले सज्जन कुमार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.