माजी नगरसेवक मुकुंद थोरात यांचे निधन

mukund

शिवसेनेचे माजी नगरसेवक मुकुंद थोरात (65) यांचे सोमवारी संध्याकाळच्या सुमाराला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मुकुंद थोरात यांचा दांडगा जनसंपर्प होता तसेच सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. ते घाटकोपर पश्चिममधून एकदा अपक्ष तर सलग दोन वेळा शिवसेनेतर्फे असे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेत गटप्रमुख, उपविभागप्रमुख पद सांभाळले तर पालिकेचे प्रभाग समिती अध्यक्ष, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष, बेस्ट समिती सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी विद्याविहार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत, सुनील मोरे, चंद्रकांत मालकर, चंद्रपाल चंदेलिया, विजय पडवळ, राजू घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या