माजी क्रिकेटपटुचे कोरोनामुळे निधन, खेळांडूंनी वाहिली श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील माजी क्रिकेटपटू संजय दोबाल यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. संजय दोबाल हे दिल्लीच्या क्लब क्रिकेटसाठी खेळले होते तसेच ते दिल्लीतील एका प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून ओळखले जायचे. डोबाल यांच्या मृत्युवर दिल्ली क्रिकेट असोशिएशनने शोक व्यक्त केला आहे.

53 वर्षीय डोबाल यांचे दोन्ही मुलगे सिद्धांत व एकांश हे क्रिकेट खेळतात. सिद्धांत हा राजस्थानसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो तर एकांश हा दिल्ली अंडर 23 साठी खेळतो. डोबाल यांना काही दिवसांपूर्वी कावीळ झाली होती. त्यानंर त्यांची चाचणी केली तर ते कोरोना पॉझिटिव्ह आले. गेल्या तीन आठवड्यांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोबाल यांच्या म़त्यूमवर सुरेश रैना, विरेंद्र सेहवाग, माजी बीसीसीआय अध्यक्ष सीके खन्ना, माजी क्रिकेटपटू मदनलाल, मनहासो यांनी शोक व्यक्त केला आहे.