T-20 World Cup विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी श्रीलंकेची मोठी खेळी, माजी हिंदुस्थानी खेळाडुची प्रशिक्षकपदी केली निवड

T-20 World Cup 2026 साठी सर्व संघांनी आतापासून जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. 7 फेब्रुवारीपासून चौकार आणि षटकारांचा रणसंग्राम सुरू होणार आहे. हिंदुस्थान आणि श्रीलंकेच्या संयुक्त आयोजनामध्ये स्पर्धा खेळली जाणार आहे. याच दरम्यान श्रीलंकेने आपल्या प्रशिक्षकांमध्ये एका हिंदुस्थानीची निवड केली आहे.

श्रीलंकेला मागील 12 वर्षांमध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे 2026 साली हा वर्ल्ड कप विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जोरदार तयारी केली आहे. पुढील तीन महिन्यांसाठी टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक आर श्रीधर हे श्रीलंकेला क्षेत्ररक्षणाचे धडे देणार आहेत. आर श्रीधर पहिल्यांदाच अशी मोठी जबाबदारी पार पाडणार आहेत. आंतरराष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असणार आहे. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी आर श्रीधर श्रीलंकेसोबत टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

ICC Men’s T20 WC Schedule – 20 संघ, 55 सामने; टी20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर, रोहित शर्मा ब्रँड ॲम्बेसेडर

आर श्रीधर यांच्याकडे प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रशिक्षण करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. 2014 साली पहिल्यांदा आर श्रीधर यांची टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर अनेक वर्ष त्यांनी खेळाडूंना क्षेत्ररक्षणाचे धडे दिले.