माजी आयएसआय चीफला 14 वर्षांचा तुरुंगवास

पाकिस्तानचे माजी आयएसआय चीफ लेफ्टनेंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना सैन्य न्यायालयाने 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. राजकारणात सहभागी होणे हे अधिकृत सिक्रेट्स ऍक्टचे उल्लंघन आहे. तसेच पदांचा दुरुपयोग करणे आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये दोषी ठरवून फैज यांना कोर्टाने ही शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली होती. 15 महिन्यांनंतर कोर्टाने फैज यांना दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली आहे.