माजी पंतप्रधान मनमोहन सिंह एम्स रुग्णालयात दाखल

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना गेले दोन दिवस ताप येत असल्याने त्यांना  संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना एम्सच्या कार्डीओ न्यूरो टॉवर विभागात ठेवण्यात आले आहे.

19 एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मनमोहन सिंह यांना दिल्लीतील एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होत. 88 वर्षीय मनमोहन सिंग यांनी कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र तरिही त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

मनमोहन सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. 1990 मध्ये त्यांची पहिली शस्त्रक्रिया इंग्लंडमध्ये झाली होती. तर 2004 मध्ये त्यांची एस्कॉर्ट रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली होती. 2009 मध्ये एम्स रुग्णालयात त्यांच्यावर दुसऱ्यांदा बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या