हॅरिसकडून पराभूत होण्याची भीती, ओबामा यांचा डोनाल्ड ट्रम्पवर हल्ला

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. शिकागो येथील डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली. ट्रम्प यांना कमला हॅरिस यांच्याकडून पराभूत होण्याची भीती असल्याने ते हॅरिस यांच्यावर वैयक्तिक टीका करत आहेत, असा हल्ला ओबामा यांनी केला. ट्रम्प हे नऊ वर्षांपासून जनतेला आपल्या समस्या सांगत सुटले आहेत, असेही ओबामा म्हणाले.

फोडाफोडीचे राजकारण जनतेला नकोय

ट्रम्प हे आधीपासून फोडा आणि राज्य करा, या धोरणाचे आहेत. ट्रम्प यांना निवडून देऊन अमेरिकेला पुन्हा चार वर्षांची अराजकता नकोय. त्यांचा आधीचा चार वर्षांचा कार्यकाळ सर्वांनी अनुभवला आहे. तो आता पुन्हा नकोय, असे बराक ओबामा म्हणाले. या वेळी मिशेल ओबामा यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.