अमेरिकेत बेपत्ता झालेले चार हिंदुस्थानी मृतावस्थेत आढळले

न्यूयॉर्कमधील बफेली शहरातून पेनसिल्व्हेनियातील पिट्सबर्ग शहर अशी रोड ट्रीप करत निघालेले चार हिंदुस्थानी नागरिक अचानक बेपत्ता झाले होते. ते सर्व आता मृतावस्थेत आढळले आहेत. चारही ज्येष्ठ नागरिकांचे मृतदेह आज सापडले. या चौघांचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे मार्शल काऊंटी शेरीफ कार्यालयाकडून एका निवेदनाद्वारे देण्यात आली. या चौघांचे वाहन 2 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बिग व्हीलिंग क्रीक रोडवरील एका उंच बंधाऱयाजवळ आढळून आले. आशा दिवाण, किशोर दिवाण, शैलेश दिवाण आणि गीता दिवाण अशी चौघांची नावे आहेत.