
सामना ऑनलाईन । शोपिया
जम्मू-कश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. आज पहाटेच्या सुमारास कश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला.
चांदपोराचा शौकत अहमद, पुलवामाचा अहमद खांडे, परथिपोराचा सुहैल युसूफ आणि शोपियाचा रफी हसन मीर अशी या चार दहशतवाद्यांची नावे आहे. दक्षिण कश्मीरच्या शोपिया येथील किगममध्ये दारमदोरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर या भागात शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी जोरदार चकमक झाली त्यात चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला.


























































