
इंग्लंडमधील एका चार वर्षांच्या मुलाला खेळत असताना जमिनीखाली गाडलेला सोन्याचा तुकडा सापडला आहे. या सोन्याच्या तुकडय़ाची किंमत तब्बल 360 दशलक्ष म्हणजेच 36 कोटी रुपये आहे. हा मुलगा त्याच्या वडिलांसोबत बागेत मेटल डिटेक्टर घेऊन खेळत होता. मशीनने बीप करायला सुरुवात केली. त्यानंतर मुलाने माती खणून काढली. त्यावेळी त्याला सोन्याचे तुकडे सापडले. हे सोन्याचे लॉकेट असून ते जवळपास 500 वर्षांहून अधिक जुने आहे. याची सोनाराकडे जाऊन तपासणी केल्यानंतर यात 73 टक्के शुद्ध सोने आढळून आले.




























































