
मराठवाडा संवाद दौऱ्याच्या चौथ्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात ताड बोरगावमध्ये आणि सेलु तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते-खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.




























































