अकरावीचे आत्तापर्यंत 8 लाख प्रवेश

राज्यात अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून चौथी फेरी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत 8 लाख 11 हजार 731 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशासाठी अद्यापही 13 लाख 29 हजार 699 जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी उद्या (दि. 31) सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. उद्या (दि. 31) ऑगस्टला प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना 2 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. तर 4 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता रिक्त जागा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.