उमेश यादवला 44 लाखांचा चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान संघातील जलदगती गोलंदाज उमेश यादवला त्याच्याच मॅनेजरने लाखो रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. उमेश यादवच्या खात्यातील 44 लाख रुपये परस्पर काढून मॅनेजर शैलेश ठाकरेने  स्वतःच्या नावे संपत्ती खरेदी केली. हा प्रकार समोर आल्यानंतर नागपूर पोलिसांनी  मिळालेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा  दाखल केला आहे. पोलीस फरार व्यवस्थापकाचा शोध घेत आहे.

गोलंदाज उमेश यादवची एकेकाळी मित्र आणि आता मॅनेजर असलेल्या व्यक्तीने फसवणूक केलीये. उमेश यादवने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. या घटनेची नागपूरमध्ये चांगलीच चर्चा रंगलीय. सध्या पोलीस उमेश यादवच्या मॅनेजरचा शोध घेत आहेत. उमेश यादव ची हिंदुस्थान  क्रिकेट संघात निवड झाल्यापासून देशात आणि देशाबाहेर खेळण्यासाठी जावे लागते. त्यामुळे उमेश यादवने त्याचा मित्र असलेला आरोपी शैलेश ठाकरे याला पत्रव्यवहार, इन्कम टॅक्स, बँक व इतर व्यवहाराकरिता पगारी मॅनेजर म्हणून ठेवून घेतले होते.