
बहुचर्चित टोरेस प्रकरण ताजे असताना 45 दिवसांत दुप्पट रकमेच्या आमिषाने फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तक्रारदार हे माहीम येथे राहतात. ते बेस्टमधून सेवानिवृत्त आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका मित्राने दिलेल्या माहितीवरून त्यांनी इन्वेस्टमेंट ऍण्ड फायनान्स कन्सलटन्सी नावाच्या कंपनीत रक्कम दुप्पट मिळण्याच्या आमीषाने गुंतवणूक केली होती. मात्र 45 दिवसांनंतरही त्याने कोणालाही दुप्पट रक्कम न देता कार्यालय बंद करून पळ काढला. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.