वरळीत मोफत आरोग्य सेवा 

शिवसेना, युवासेनेच्या वतीने वरळी विधानसभेत 27 जुलै 2025 ते 26 जुलै 2026 या वर्षभराच्या कालावधीत मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. हार्ट बायपास, अँजिओप्लास्टी, लेझर थायरॉईड ऑपरेशन, ब्रेन स्टेंटिंग, डायलिसीस, मोतीबिंदू असे उपचार केले जाणार आहेत. यासाठी लायन ताराचंद बापा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सहकार्य असणार आहे. अधिक माहितीसाठी आयोजक, युवा विभाग अधिकारी संकेत सावंत यांच्याशी 8879202077 या क्रमांकावर संपर्क साधावा.