धक्कादायक! दारू पाजली नाही म्हणून मित्राचे गुप्तांग कापले

67
murder-knife

सामना ऑनलाईन । पीलीभीत

उत्तर प्रदेशमधील पीलीभीत जिल्ह्यात मित्रांना दारू पाजली नाही म्हणून एका तरुणाचे गुप्तांग कापण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस सध्या त्या नराधमांचा शोध घेत आहे.

पीलीभीतीमध्ये गुरुवारी मातीची भांड्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बेनहर कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच तेथे मातीच्या भांड्याचे प्रदर्शन देखील होते. त्या प्रदर्शनात देवदत्त प्रजापती या तरुणाला 21000 रुपयांचे बक्षिस देण्यात आले. त्यानंतर हे बक्षिस मिळाले म्हणून गावातील चेतराम, सुंदरलाल यांनी देवदत्तकडे पार्टीसाठी दारूची मागणी केली. मात्र देवदत्तने दारू पाजण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला व वादानंतर चेतराम-सुंदरलाल यांनी देवदत्तला मारहाण करत त्याचे गुप्तांग कापले. त्याचवेळी तेथे आलेल्या देवदत्तच्या भावाने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले व त्या दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या