गडचांदूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर, काँग्रेस-शिवसेनेला सर्वाधिक जागा

1023

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने बहुमत मिळवले आहे. 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस (5) आणि राष्ट्रवादीने (4) अशा एकून 9 जागा जिंकून बहुमत मिळवले. या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आघाडी होती.

दुसरीकडे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही निवडणूक स्वतंत्र लढले होते. शिवसेनेला पाच, भाजपला 2 आणि शेककरी संघटनेला 1 जागा मिळाली.

ss2

दरम्यान, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सविता टेकाम विजयी झाल्या. त्यांनी भाजप उमेदवाराचा 1100 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले होते.

17 जागांसाठीचा निकाल –
काँग्रेस – 5
राष्ट्रवादी – 4
शिवसेना – 5
भाजप – 2
शेतकरी संघटना – 1

आपली प्रतिक्रिया द्या