गडचांदूर नगरपालिका निवडणूकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा विजय; भाजपला दणका

1141

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने बहुमत मिळवलं असून नगराध्यक्षपदही खेचून आणलं आहे. या निवडणूकीत शिवसेनेलाही पाच जागांवर विजय मिळाला असून भाजप 2 जागांवर तर शेतकरी संघटनेला एका जागेवर विजय मिळाला. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी प्रचार करूनही भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागलं.

नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक झाली. यात काँग्रेसच्या सविता टेकाम निवडून आल्या. या निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले. 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 9 जागा जिंकून बहुमत मिळवलं. निवडणुकीत या दोन्ही पक्षांची आघाडी होती, तर शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले. शिवसेनेनंही 5 जागा जिंकून आपले अस्तित्व ठळक केले. निकाल लागताच कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांच्या वाजतगाजत मिरवणुका काढल्या. या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झालं होतं.

घोषित निकाल
काँग्रेस – 5
राष्ट्रवादी – 4
शिवसेना – 5
भाजप – 2
शेतकरी संघटना – 1

आपली प्रतिक्रिया द्या