गडचिरोली जिल्ह्याच्या युवासेना विस्तारकपदी नीलेश बेलखेडे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या युवासेना विस्तारकपदी नीलेश बेलखेडे यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.