गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यामध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आठ लाखांचे बक्षिस लावलेल्या नक्षलवादी दाम्पत्याने पोलिसांसमोर आत्मसमपर्ण केले होते.
दोन दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आठ लाखांचे बक्षिस लावलेल्या एका नक्षली दाम्पत्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. असिन राजाराम कुमार (37) उर्फ अनिल आणि त्याची पत्नी अंजू सुल्या जले (28) उर्फ सोनिया अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशामध्ये अनिस कुमार हा नक्षलवाद्यांचा प्रेस टीमचा एरिया कमेटी सदस्य होता. तो हरयाणाच्या नरवाना येथील रहिवासी होता आणि हिमाचलमध्ये शिमला येथे बनावट नावाने राहत होता.
सोमवारी पोलीस गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्याविरोधात शोधमोहिम राबवली होती. दरम्यान पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दोन्ही ठिकाणाहून झालेल्या गोळीबारामध्ये चार नक्षलवादी ठार झाले.