गडचिरोली – नक्षल्यांचा पोलिसांवर हल्ला, एक जवान शहीद

719

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात कोठी येथे नक्षल्यांनी पोलिसांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद तर एक गंभीर जखमी झाला आहे. दुष्यांत नंदेश्वर असे शहीद जवानाचे नाव आहे, तर दिनेश भोसले जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस गावातील दुकानात सामना घेण्यासाठी गेले होते. याच वेळी घात लावून बसलेल्या नक्षल्यानी पोलिसांवर गोळीबार केला. यात एक जवान शहीद झाला. नक्षल्यांच्या ऍक्शन टीमने हल्ला केल्याची माहिती मिळत असून हल्ल्यानंतर नक्षली फरार झाले. पोलीस आणि जवान त्यांचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या