गडचिरोली : पिकअप पलटली; 19 मजूर जखमी, 6 गंभीर तर 13 किरकोळ जखमी

428
pick-up-accident-gadchiroli

धान रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पालटून झालेल्या अपघातात 19 मजूर जख्मी झाले. यामध्ये सहा गंभीर तर 13 किरकोळ मजूर जखमी झाल्याची घटना आज सकाळीच्या सुमारास कुरखेडा मालेवाडा मार्गावर सालईटोला गावानजीक घडली. यामध्ये सहा मजूर गंभीर जखमी असल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलविण्यात आले आहे. जखमींची नावे पिंकी दरवडे 18, जयंत दरवडे 20, संगीता दरवडे 38, कविता देव्हारे 36, रामू देव्हारे 40, यादव शेंडे 35, हिना शेंडे 30, कुसूम नागोसे 50, मोनिका दरवडे 20, गणेश नेवारे 21, पुनम पंधरे 20, गीता देव्हारे 40, गुड्डू नेवारे 30, सचिन मुंगणकर 22, गोपिका दुमाणे 40, योगिता राऊत 35, दर्शना सहारे 25, इंदू मंडकाम 40, सरिता मेश्राम 35 यांचा समावेश आहे. यामधे गंभीर जखमी असलेल्या पिंकी दरवडे, यादव शेंडे, कुसूम नागोसे, मोनिका दरवडे, गणेश नेवारे व सरिता दुमाणे या जखमींना येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सर्व मजूर कुरखेडा तालुक्यातील वाघेडा येथिल रहिवासी आहेत, मजूर वाघेडा येथून एका पिकअप मेटाडोरने तालुक्यातील येंगलखेडा येथे धान रोवणीच्या कामासाठी जात होते दरम्यान सालईटोला गावाजवळ वाहनचालकाचे संतुलन बिघडल्याने वाहन पालटल्याने हा अपघात झाला.

आपली प्रतिक्रिया द्या