गढीताम्हणे येथील वृद्धांचा विहरीत मृतदेह आढळला

624
प्रातिनिधिक

देवगढ तालुक्यातील गढीताम्हणे रहाटेश्वर येथील पंढरीनाथ रघुनाथ धुरी या 50 वर्षीय इसमाचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. ही घटना गढीताम्हणे रहाटेश्वर येथे 2 जून रोजी सायंकाळी घडली आहे. या संदर्भात राजेंद्र दिनकर धुरी यांनी देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत हे मुके व कर्णबधिर असून 2 जून रोजी ते सायं.4 च्या सुमारास घरातून बाहेर फिरण्यासाठी गेले होते. साय.7 वाजेपर्यंत ते न आल्याने मुलीने शोध घेतला असता शेतजमिनीच्या लगतचे नदी किनारी असलेल्या व कठडा नसलेल्या विहिरी शेजारी मयतचे चप्पल मिळाले .त्याअनुषंगाने शोध घेतला असता मृतदेह विहिरीत आढळून आला. त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस नाईक नित्यानंद पारधी करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या