गहिनाथगड येथील पादुका हेलिकाॅप्टरने पंढरपूरला नेणार

526

आषाढी एकादशीनिमित्त क्षेत्र गहिनीनाथगड ते श्री. क्षेत्र पंढरपूर येथे जाणारा गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊ महाराज पायी दिंडी सोहळा कोरोना महामारीमुळे यावर्षी रद्द झाला आहे.

माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून गहिनीनाथ गडावरून संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका हेलिकॉप्टरमधून पंढरपूरला जाणार आहेत. श्री. संत वामनभाऊ महाराज यांनी १२५ वर्षापुर्वी प्रारंभीत केलेला पायी दिंडी सोहळा आहे. त्या धर्तीवर शासनाचे नियम पाळत या पादुका सोहळ्यात खंड होऊ नये म्हणुन मठाधिपती महंत विठ्ठल महाराज हे हेलिकॉप्टरमधुन घेऊन जाणार आहेत. महंत विठ्ठल महाराज यांच्या समवेत माजी आ.भीमराव धोंडे व पुजारी जाणार आहेत. दि.३० जून रोजी दुपारी हा पादुका प्रस्थान सोहळा होणार आहे.

यावेळी पुढे बोलताना भीमराव धोंडे म्हणाले की, आपण या पायी दिंडी सोहळ्याचे लाखो भाविकांना पंढरपूर जवळ पखालपूर याठिकाणी जेवण देतो. परंतु यावर्षी जेवण देण्याचा प्रश्नच नसल्याने आपणाला संत वामनभाऊंनी गहिनाथगडाच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला घेऊन जाण्याची सद्बुद्धी दिली असल्याचे माजी आ. भीमराव धोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या