गलवान खोऱ्याच्या फिंगर 4 मध्ये अजूनही चिनी माकडांचा मुक्काम

1632
galwan-valley

प्रत्यक्ष सीमारेषेकरून सैन्य दोन किमी घ्यायचे असे ठरल्यानंतरही चिनी सैन्याने गलवान खोऱयातील फिंगर 4 या पॉईंटवरून मुक्काम हलवलेला नाही. या भागात अजुनही मोठय़ा प्रमाणावर चिनी सैनिक ठाण मांडून असल्याचा भंडाफोड उपग्रह छायाचित्राने केला आहे.

गेल्या महिनाभरापासून चीनच्या युद्धखोरीमुळे लडाख सीमा अशांत आहे. गलकान हिंसाचारानंतर दोन्ही देशांच्या लष्करी तसेच मुत्सद्दी अधिकाऱयांमध्ये अनेकवेळा चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल व चीनचे परराष्ट्र मंत्री कांग यी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी प्रत्यक्ष सीमारेषेवरून आपापले सैन्य दोन किमी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हिंदुस्थानने आपले सैन्य माघारी बोलावले. गलवान खोऱयातून चीननेही काढता पाय घेतला. हॉटस्पिंग, गोगरा आदी ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या चिनी सैनिकांनी बाडबिस्तरा गुंडाळून परतीची वाट धरली.

लडाख सीमा पूर्ककत होत असतानाच आज स्कायसॅट या उपग्रहाने पाठवलेल्या छायाचित्राने चीनची बनवाबनवी उघड केली. गलवान खोऱयातील अत्यंत महत्त्वाच्या फिंगर 4 या पॉईंटवर अजूनही चिनी तंबू तसेच असून मोठय़ा प्रमाणावर लष्करही मुक्काम ठोकून असल्याचे या छायाचित्रावरून स्पष्ट झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या