गलवानमधील हिंदुस्थानी जवानांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर! अजय देवगणने केली घोषणा

काही दिवसांपूर्कीर्वी पूर्व लडाखमधील गलवान खोऱयात चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. तर 40 पेक्षा जास्त चिनी सैनिक मारले गेले होते. गलवान खोऱयामधील हिंदुस्थानी जवानांची शौर्यगाथा आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

अभिनेता अजय देवगणने नुकतीच या संदर्भात घोषणा केली आहे. अजय देवगणच्या एएफ फिल्म्स आणि सिलेक्ट मिडीया होल्डिंग्स एलएलपी यांनी या चित्रपटाच्या निर्मितीचा विडा उचलला आहे. चित्रपटाचे नाव आणि त्यातील कलाकार अद्याप फायनल झालेले नाही. 15 जून रोजी गलवान खो-यात हिंदुस्थान आणि चीनच्या सैन्यांमध्ये हा संघर्ष झाला होता. 1975 नंतर पहिल्यांदाच या ठिकाणी चकमक पाहायला मिळाली होती. नुकतीच अजयने त्याच्या आगामी ’मैदान’ सिनेमाच्या रिलिजच्या तारखेची घोषणा केली असून हा सिनेमा पुढच्या वर्षी 13 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या