पेणमध्ये जुगाराच्या अड्ड्यावर धाड

826

ऐन निवडणुकीच्या हंगामात पेण शहरात पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला असून 25 जुगारींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेण शहरातील चावडीनाका परीसरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक डि.सि.पोरे यांच्या नेतृत्वाखाली एसएस.एच.शेवते, पि.बि.दबडे, एस.एस.शेलार,एस.डी.खराटे, डि.पि.पेढवी यांच्या पथकाने जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी या ठिकाणी जुगार खेळताना संजय महाबळे, चंद्रकांत सरोदे, विठोबा पाटील, अन्वर खान, कमळाकर काष्टे, अजिम पठाण, मधुकर पाटील, आतिक मुजावर, विजय पाटील, मधुकर शिर्के यांच्यासह 25 जणांना जुगार खेळताना पकडले आहे. यावेळी पोलिसांनी 3 लाख 45 हजार 370 रूपयांचा मुद्देमाल जुगाराचे पत्ते, प्लास्टिकचे काॅईन,रोख रक्कम व ईतर साहित्य जप्त केले आहेत. या आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या