गेमईऑनचे 10 लाख गेम्स डाऊनलोड, लॉकडाऊनच्या काळात ‘पॉझिटीव्ह’ कामगिरी

देशी गेमिंग कंपनी गेमईऑन 2013 पासून कार्यरत आहे. कंपनी मासिक 10 दशलक्ष डाऊनलोड वृद्धीच्या आलेखाकडे वाटचाल करत आहे. लॉकडाऊनच्या काळात निराशेचे मळभ दाटलेले असताना गेमईऑनच्या या चमकदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वत:च्या अधिपत्याखाली स्थिरपणे मोठमोठे गेम टायटल्स प्राप्त करत गेमईऑनने हिंदुस्थानी गेमिंग इंडस्ट्री मध्ये स्वत:चं विशेष स्थान निर्माण केले आहे. गेमईऑनचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल मालनकर यांना गेम्स तयार करण्याच्या या क्षेत्राचा 7 वर्षांहून अधिक अनुभव आहे. येत्या काही वर्षांत गेमईऑनचा विस्तार करण्याचे उद्दीष्ट आहे.

“खेळांना सीमारेषांची आवश्यकता नसते. त्यांचा आनंद कोणीही, कुठूनही घेऊ शकतो. आपकाजॅग्स सारखा यू ट्यूबर्स आणि प्रियल धुरी सारख्या इन्फ्लुएर्स सोबत हातमिळवणी करुन युवा प्रेक्षकांपर्यंत आमचे गेम्स पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मजबूत खेळाचे डिझाईन आणि आयएपी रचनेच्या दृष्टीने दररोज उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ‘ट्रीटो’ज ऍडव्हेंचर’ मिळवल्यानंतर, आमची व्यापक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची आणि हिंदुस्थान व परदेशातील खेळाडूंना रोमांचकारी गेम्स देण्याची योजना आहे.” असे निखिल मालनकर म्हणतो.

आपली प्रतिक्रिया द्या