कामसूत्राच्या अभिनेत्रीला कोरोनाची लागण

16749

कामासूत्र या चित्रपटात व गेम ऑफ थ्रोन्स या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये अभिनय केलेली हिंदुस्थानी वंशाची अभिनेत्री इंदिरा वर्मा हिला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. इंदिराने स्वत: इंस्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. इंदिरा सध्या तिच्या लंडनमधील घरातच विलीगीकरणात असून तिथेच तिच्यावर उपचार सुरू आहेत.

indira-varma

‘सध्ये जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. हे फारच वाईट आहे. मी पण आता घरात आहे. मला हे आवडत नाहीए. पण सिगल व फिनिक्स सारखी पुन्हा राखेतून भरारी घेईन’, असे इंदिराने इंस्टाग्रामवर लिहले आहे. गेम ऑफ थ्रोन्समध्ये काम करणाऱ्या क्रिस्टोफर हिवजू या अभिनेत्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. याव्यतिरिक्त हॉलिवूडमधील इद्रिस इल्बा, टॉम हँक्स व त्याची पत्नी, अभिनेत्री रिटा विल्सन व ओल्गा कुरेलेंको यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या