बाप्पाचे चंद्रपुरात जल्लोषात स्वागत; गणपती बाप्पा मोरया… मंगल मूर्ती मोरया…जयघोषात परिसर भक्तीमय

गणपती बाप्पा मोरया… मंगल मूर्ती मोरया… असा जयघोष करत मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाचे चंद्रपुरात स्वागत करण्यात येत आहे. मंगळवारी घराघरात बाप्पांचे आगमन झाले असून पुढील दहा दिवस मोठ्या जल्लोषात गणरायची पूजाअर्चा केली जाणार आहे. सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी मोठ्या संख्येने गणपतीच्या स्टॉलवर भक्तांनी गर्दी केली होती.

सार्वजनिक मंडळांनी ढोलताशांचा गजरात तर घरगुती गणेशाचे दुचाकी, चारचाकी वाहनाने गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी लगबग बघायला मिळाली. घराघरात गणपती बाप्पाचे आगमन जोशात, जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात झाले. सार्वजनिक मंडळाच्या सदस्यांनी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी केली आहे. शहरातील अनेक हॉटेल मध्ये मोदका साठी गर्दी झाली आहे.