गणेश नाईक बुधवारी राष्ट्रवादीला रामराम ठोकणार

1375

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. ते महापालिकेतील सुमारे 50 नगरसेवकांसह येत्या बुधवारी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे नाईक भाजपमध्ये केव्हा जाणार की  राष्ट्रवादीमध्येच राहणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे.

11सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नवी मुंबई सिडकोच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर वाशी येथे होणाऱ्या कार्यक्रमात नाईक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशापूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक एक गट तयार करणार असून तसे शपथपत्र कोकण विभागीय आयुक्तांना देणार आहेत. सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसांत ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या