चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा शनिवारी अलोट गर्दीत संपन्न झाला. मुंबईतील भव्य आगमन सोहळा, अशी चिंतामणी गणेशोत्सव मंडळाची ओळख आहे. त्यामुळे चिंतामणीच्या आगमन सोहळय़ाला प्रचंड गर्दी होते. या गर्दीत तरुणाईचा उत्साह अधिक असतो. हा आगमन सोहळा विनाविघ्न पार पडावा याकरिता काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहिते यांनी विशेष नियोजन केले होते. आमदार अजय चौधरी यांच्या सहकार्याने शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख काका कदम, उपशाखाप्रमुख गिरीश परब, श्री हनुमान उत्सव मंडळाचे विश्वस्त नारायण मसुरकर, देवेन पराडकर, विजय राणे, देवदास जाधव, प्रवीण जाधव, हेमंत मांजरेकर, शशी परब, सनी लब्दे यांच्या वतीने सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. हरहरवाला बिल्डिंगच्या वतीने 21 हजार वडापावचे गणेशभक्तांना वाटप करण्यात आले.