रत्नागिरी – गणपती विसर्जनादरम्यान राजापूरात तीन तरूण बुडाले

2638

गणपती विसर्जनासाठी गेलेले तिघे तरूण बुडाल्याची दुर्देवी घटना राजापूर तालुक्यात गुरुवारी सायंकाळी घडली.

अनंत चतुदर्शी निमित्त आज अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. राजापूर तालुक्यात दोन ठिकाणी गणपती विसर्जनाप्रसंगी दुर्देवी घटना घडली.सायंकाळी पावणे सात वाजता धोपेश्वर येथे गणपती विसर्जन करताना सिध्देश प्रकाश तेरवणकर (वय 20 रा.धोपेश्वर) हा तरुण बुडाला. ही घटना ताजी असताना राजापूर तालुक्यातील पडवे येथे गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघे तरूण बुडाले. कुलदीप रमाकांत वारंग (वय 20) आणि ऋतिक दिलीप भोसले (वय 26) असे बुडालेल्या दोघांची नावे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या