उत्तर प्रदेशमध्ये दलित अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये हाथरस प्रकरण ताजे असताना एका अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पोलिसांनी कारवाई न केल्याने पीडित तरुणीने आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमधील ही घटना असून या प्रकरणी सर्व स्तरांतून टीका होत आहे.

चित्रकूटमध्ये 8 ऑक्टोबर रोजी एका 15 वर्षीय दलित मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. पोलिसांनी कुठलीच कारवाई न केल्याने पीडित मुलीने मंगळवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नंतर पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींविरोधात ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे, असे असले तरी पोलिसांनी बलात्कार झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर बलात्कार झाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कुठलीच तक्रार केली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.