उत्तर प्रदेशात तरुणीवर सामूहिक बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरवर  तर बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशात एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे देशभरातील महीला, मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. तुझ्या भावाचा अपघात झाला आहे, असे खोटे सांगून या विद्यार्थीनीला चार तरुणांनी कारमध्ये बसवले आणि शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार करणारे चारही तरुण पीडित मुलीच्या भावाचे मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे.

सामुहिक बलात्कारानंतर ही तरुणी बेशुध्द पडली. त्याच अवस्थेत तिला टाकून चौघांनी पळ काढला. शुध्दीवर आल्यानंतर या तरुणीने 100 क्रमांकावर फोन करून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या मुलीला पोलीस ठाण्यात आणले. राजा उर्फ रॉबिन, ज्ञानेंद्र, गौतम अशी आरोपींची नावे आहेत. चौथ्याचे नाव तिला माहीत नसल्याचे तिने सांगितले. पुढील तपास सुरू आहे.