
आर्थर रोड तुरुंगात गुंड प्रसाद पुजारीवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एन. एम. जोशी पोलिसांनी प्रसाद पुजारीसह सात जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. प्रसाद पुजारी हा दोन दशकांपासून फरार होता. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्याला चीनमधून हिंदुस्थानात आणण्यात आले होते. तेव्हापासून तो आर्थर रोड तुरुंगात आहे. गेल्या आठवड्यात दोन वेगवेगळ्या गटांमधील परस्परांचे भांडण झाले. भांडण हाणामारीपर्यंत पोहचले. या घटनेची माहिती जेल प्रशासनाने एन. एम. जोशी पोलिसांना दिली होती.