गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची परवड, नेरुळमध्ये अर्धा किलोमीटरची रांग

373
प्रातिनिधीक फोटो

गॅस सिलेंडर बुक केल्यानंतरही न मिळाल्यामुळे ग्राहकांनी नेरुळ येथील सेजल गॅस एजन्सीसमोर आज गॅस सिलेंडर घेऊ रांग लावली. ही रांग जवळपास अर्धा किलोमीटर गेल्यामुळे याही ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळला गेला नाही. गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना ताटकळत तीन ते चार तास थांबावे लागले.

नेरुळ येथील सेक्टर 3 मध्ये असलेल्या सेजल गॅस एजन्सीकडे सर्वाधिक ग्राहक आहेत. बुकींग होऊन अनेक दिवस उलटले तरी गॅस सिलेंडर घरी आला नाही. अनेक नागरिकांनी दूरध्वनीवरून चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र एजन्सीचा फोन उचलला गेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आज आज गॅस एजन्सीच्या बाहेर सिलेंडर घेऊन मोठी रांग लावली. एजन्सीकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे सिलेंडर वाटपाचे काम संथ गतीने झाले. त्यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या