हेल्मेट घालून घरात शिरले… बाईकवरून चक्क सिलिंडर चोरून नेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे  देशभरात एलपीजी (LPG) सिलिंडर तुटवडा असताना, दुसरीकडे चोरांनी आता थेट लोकांच्या घरातील गॅस सिलिंडरवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. बंगळुरूमध्ये एका घरातून घरगुती गॅस सिलिंडर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू मधील एका निवासी भागातून ही चोरी झाली आहे. सध्या शहरात गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीने नागरिक चिंतेत आहेत. बाईकवरून हेल्मेट घालून आलेल्या दोन चोरांनी याच परिस्थितीचा फायदा घेत चोरांनी एका घराचे कुलूप तोडून तिथले गॅस सिलिंडर लंपास केले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर याप्रकरणी घरातल्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून चोरांचा शोध सुरू केला आहे.