भाजप खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याच्या धमक्या, सुरक्षेची मागणी

475

माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली येथील भाजप खासदार गौतम गंभीर याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या प्रकरणी गौतमने पोलीस ठाण्याला पत्र लिहून माहिती दिली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गौतमला एका आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकाहून फोन आला. त्या फोनवरून त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे गौतमने शादहरा पोलीस ठाण्यात विनंती करणारं पत्र दिलं आहे. गौतमने दिलेल्या पत्रात तक्रार दाखल करून कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. गौतमला दोन दिवसांपूर्वी ही धमकी आल्याची माहिती मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या