धोनीमुळे वर्ल्ड कप फायनलमध्ये शतक हुकले! गौतमचा गंभीर आरोप

774

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात हिंदुस्थानी क्रिकेट संघाने 2007 साली टी-20 आणि 2011 साली वन डे वर्ल्ड कप जिंकण्याची करामत केली. या दोन्ही वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत गौतम गंभीरने दमदार अर्धशतकी खेळी साकारत टीम इंडियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. याप्रसंगी मात्र 2011 सालामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत तीन धावांनी शतक हुकल्याचे दुःख गौतम गंभीरने व्यक्त केले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका सल्ल्यामुळे एकाग्रता भंग पावली आणि शतकाला मुकलो, असे गौतम गंभीर पुढे स्पष्टपणे म्हणाला.

97 धावांवर खेळत असताना मी वैयक्तिक धावांचा विचारही केला नव्हता. त्यावेळी श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याकडे माझे लक्ष होतं. पण तू तीन धावा काढून शतक पूर्ण कर, असे धोनीने मला त्यावेळी सांगितले. पण त्याने मला हा सल्ला दिला नसता तर मी तीन धावा काढल्या असत्या. त्याने मला आठवण करून दिली आणि मी अधिक सावध झालो. थिसारा परेराच्या पुढच्या चेंडूवर एक चुकीचा फटका मारून मी बाद झालो, असे गंभीरने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या