हार्दिक पांडय़ाला हिंदुस्थानकडे पर्याय नाही, गौतम गंभीरचे उद्गार

 हिंदुस्थानचा क्रिकेट संघ पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. या लढतीत टीम इंडियाचा संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला. याचा फटका विराट कोहलीच्या ब्रिगेडला बसला. हार्दिक पांडय़ा दुखापत पुन्हा उद्भवू नये यासाठी सध्या तरी गोलंदाजी करीत नाही. वन डे क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूची गरज असते. अशा परिस्थितीत हिंदुस्थानकडे हार्दिक पांडय़ाला पर्याय नाही, असे हिंदुस्थानचा क्रिकेटपटू गौतम गंभीरला वाटते.

हार्दिक पांडय़ा गोलंदाजीसाठी फिट नसेल तर हिंदुस्थानकडे झटपट क्रिकेटसाठी सहावा गोलंदाज असेल का? हार्दिक पांडय़ाऐवजी टीम इंडियामध्ये एका अष्टपैलू खेळाडूची निवड होऊ शकते. तो म्हणजे विजय शंकर. पण पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर येऊन तो हार्दिक पांडय़ाइतका प्रभाव पाडू शकतो का? तो किमान सात ते आठ षटके गोलंदाजी करू शकतो का? मला शंका वाटते, असे गौतम गंभीर पुढे स्पष्ट करतो.

‘ती’ समस्या कायम राहणार
झटपट क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला सहा गोलंदाजांची गरज भासते. मनीष पांडे किंवा रोहित शर्माचे संघामध्ये कमबॅक झाल्यानंतरही ती समस्या कायम असणार आहे. पहिल्या सहा फलंदाजांपैकी एखादा फलंदाजाने किमान दोन ते चार षटके गोलंदाजी करणे आवश्यक आहे. सध्या हिंदुस्थानी संघात एकही फलंदाज असे करू शकत नाही. ऑस्ट्रेलियाकडे ग्लेन मॅक्सवेल, क@मरून ग्रीन, सीन अॅबॉट, मार्पस स्टोयनीस हे अष्टपैलू खेळाडू आहेत. याचा फायदा त्यांना होतोय, असे गौतम गंभीर म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या