सलमान खान-गौतम गंभीर नातेवाईक, दोघांमध्ये आहे ‘हे’ खास नातं

2330

क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्या गोलंदाजांना सीमारेषा दाखवणाऱ्या गौतम गंभीर राजकारणाच्या मैदानात उतरला आहे. पहिल्याच निवडणुकीमध्ये गौतम गंभीरने दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. क्रिकेटनंतर राजकारणात फटकेबाजी करणाऱ्या गंभीरचे बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याच्याशी खास नातं आहे.

गौतम गंभीर क्रिकेटपटू असताना आणि आता राजकारणात असतानाही त्याच्या खासगी आयुष्याबाबत जास्त माहिती समोर येऊ देत नाही. त्यामुळे अनेकांना सलमान आणि गंभीरमध्ये असलेल्या नात्याबाबत माहिती नाही. गंभीरची छोटी बहिण एकता हिचे आश्रय शर्मा याच्याशी लग्न झाले आहे. तर सलमानची बहिण अर्पिता हिचे आयुष शर्मा याच्याशी लग्न झाले आहे. आश्रय शर्मा आणि आयुष शर्मा हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे गंभीरची बहिण आणि सलमानची बहिण या एकमेकींच्या ‘जाऊबाई’ (भावजय) आहेत. त्यामुळे सलमान आणि गंभीर यांच्यातही खास नाते निर्माण होते.

गंभीरने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून राजकीय मैदानात पाऊल ठेवले. पहिल्या निवडणुकीत पूर्व दिल्लीतून गंभीरने विजय मिळवला. राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी गंभीरने क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी नोंदवली. गंभीरने 58 कसोटीत 4154 धावा आणि 147 एक दिवसीय लढतीत 5238 धावांची नोंद आहे.

दरम्यान, सलमान खान हा आपल्या आगामी दबंग-3 चित्रपटातमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला.

आपली प्रतिक्रिया द्या