ज्याला स्वत:चे वय लक्षात राहत नाही,त्याला माझे रेकॉर्ड कसे लक्षात राहणार, गौतम गंभीरने आफ्रिदीला फटकारले

3216

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी याने त्याच्या बायोग्राफी असलेल्या पुस्तकातून हिंदुस्थानचे क्रिकेटपटू गौतम गंभीर व विरेंद्र सेहवाग यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याच्या या टिकेला गौतम गंभीर याने ट्विटरवरून जबरदस्त उत्तर दिले आहे.

‘ज्या व्यक्तीला स्व:ताचे वय लक्षात राहात नाही त्याला माझे रेकॉर्ड कसे लक्षात राहतील. चल मीच तुला आठवण करून देतो. 2007 च्या टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरोधात मी 54 चेंडूत 75 धावा केल्या होत्या तर आफ्रिदीने एका चेंडूत शून्य धावा केलेल्या. सर्वात महत्त्वाचं – आम्ही तो वर्ल्ड कप जिंकलो होतो. आणि हो मला अॅटिट्यूड आहे पण तो फक्त खोटारडे, देशद्रोही आणि संधीसाधू लोकांसाठी आहे’, अशा शब्दात गंभीरने आफ्रिदीला फटकारले आहे.

शहीद अफ्रिदीने त्याच्या पुस्तकात गौतम गंभीर व विरेंद्र सेहवागवर टीका केली आहे. ‘गौतम गंभीर आणि त्याचा अॅटीट्यूड प्रॉब्लेम. त्याला स्वत:चे असे काही व्यक्तीमत्त्व नाही. त्याच्या नावावर कोणतेही रेकॉर्ड नाही फक्त अॅटीट्यूड आहे. विरेंदर सेहवाग हा कायम ट्विटरवरून पाकिस्तानविरोधी वक्तव्य करत असतो. हे काही जबाबदार व्यक्तीचं वागणं आहे का? त्याचे चाहते संपूर्ण जगात पाकिस्तानात आहेत. आपण असा भेदभाव करू शकत नाही.’ अशी टीका करण्यात आली आहे

आपली प्रतिक्रिया द्या