लो कर लो बात, केंद्र सरकार म्हणते यंदा काही खरं नाही! विकासदर पाच टक्क्यांवरच राहणार

1237

आर्थिक मंदीचे संकट मानगुटीवर बसलेल्या हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला नवीन वर्षातही डोके वर काढायला मिळणार नसल्याची चिन्हे आहेत. 2019-20 या चालू आर्थिक वर्षाचा विकासदर 5 टक्क्यांवर राहील, असा अंदाज केंद्र सरकारने वर्तवला आहे. हा विकासदर गेल्या आर्थिक वर्षातील विकासदराच्या तुलनेत कमी आहे. याआधी रिझर्व्ह बँकेनेही 5 टक्के विकासदराचा अंदाज वर्तवला आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने मंगळवारी विकासदराबाबतीत आपला अंदाज जाहीर केला. या आकडेवारीवरून देशाची अर्थव्यवस्था अजूनही मंदीतच चाचपडत असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6.8 टक्के इतका राहिला होता. यंदा मंदीमुळे हा विकासदर 5 टक्क्यांवर राहण्याची शक्यता सरकारने वर्तवली आहे.

सलग सहाव्या दिवशी दरवाढ; पेट्रोल 5 पैशांनी तर डिझेल 12 पैशांनी महागले

इराण-अमेरिका युद्ध भडकण्याच्या शक्यतेने तेल उत्पादक आखाती देशांनी कच्च्या इंधन तेलाची निर्यात कमी केली आहे. अपुऱ्या पुरवठय़ामुळे देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्याचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 पैसे तर डिझेल दरात लिटरमागे 12 पैशांनी वाढ केली आहे. इंधन दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल 81.33 रुपये तर डिझेल 72.14  रुपये लिटर दराने विकले जात आहे. बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रात मोठी निराशा होणार आहे. उत्पादन क्षेत्राचा वार्षिक विकासदर 6.9 टक्क्यांवरून 2 टक्क्यांवर, तर बांधकाम क्षेत्राचा विकासदर 8.7 टक्क्यांवरून 3.2 टक्क्यांवर घसरेल, असा सरकारचा अंदाज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या