ठाण्यात उद्या घुमणार ‘अखंड हिंदुस्थान’चा नारा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर गीत वीर विनायक कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या 60 व्या आत्मार्पण दिनी ठाण्यात मानवंदना देण्यात येणार आहे. सावरकर चरित्र गायक सतीश भिडे हे गीत वीर विनायक या कार्यक्रमाचा 3 हजार 242 वा कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्यवीरांच्या जीवनाचा झुंझार पट मांडणार आहेत. 25 फेब्रुवारी रोजी जिजाऊ उद्यानाजवळील आचार्य अत्रे कट्टा येथे हा कार्यक्रम होणार असून यानिमित्ताने ‘अखंड हिंदुस्थान’चा नारा घुमणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 60 वा आत्मार्पण दिन येत्या 25 फेब्रुवारी रोजी आहे. त्यानिमित्त ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शीलाताई वागळे यांनी सतीश भिडे यांच्या गीत वीर विनायक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अत्रे कट्टा येथे सायंकाळी 5.30 वा. हा कार्यक्रम होणार आहे. ठाण्यातील अनेक सामाजिक आंदोलनांचे साक्षीदार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल हजारे, रांगोळीकार व गायिका विनया पिंपळे, सुमेधा बेडेकर, अपर्णा बेडेकर, वैभवी गोखले, ज्येष्ठ तबलावादक नितीन ढापरे, गायिका चित्रा जोशी, चित्रा फाटक, शैलेंद्र देवधर, वृषाली सावंत, नीलिमा शेट्ये, सरोज डोंगरे, संपदा वागळे, विदुला ठुसे, रंजना कुलकर्णी, स्मिता पोंक्षे, राधा कर्णिक, अनंत मराठे, हर्षदा पांडे यांच्यासह अनेक मान्यवर यात सहभागी होणार आहेत.