गुप्तांग आणि चड्डीच्या आकाराचे बनवले केक, महिलेला अटक

इजिप्तमध्ये एका पार्टीत स्त्री पुरुष गुप्तांगाच्या आकाराचे केक वाटण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी केक बनवणार्‍या महिलेला अटक केली आहे.

मिडल इस्ट आय या वेबसाईटने या बाबत वृत्त दिले आहे. इजिप्तच्या एका क्लबमध्ये 70 ते 75 वय असलेल्या महिलांची बॅचलर्स पार्टी होती. या पार्टीमध्ये अंतरवस्त्र आणि पुरुष, महिलांच्या गुप्तांगाच्या आकाराचे कप केक सर्व्ह करण्यात आले. त्यानंतर या पार्टीचे आणि केकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी या क्लबमध्ये धाव घेऊन कारवाई केली. तसेच हे केक बनवणार्‍या महिलेला अटक केली. नंतर महिलेची जामिनावर सुटका करण्यात आली. तसेच ज्या महिलांनी या पार्टीचे आयोजन केले होते. त्यांचे क्लबमधील सदस्य रद्द करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या