अमेरिकेत आंदोलकांनी CNN वाहिनीच्या कार्यालयात केली तोडफोड, पोलिसांची गाडीही जाळली

1187

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यावरून संपूर्ण अमेरिकेत असंतोष पसरला आहे. आंदोलकांनी आधी देशातील अनेक शहरात हिंसाचार केला होता. आता आंदोलकांनी CNN वाहिनीला लक्ष्य करत त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. तसेच आंदोलकांनी पोलिसांची गाडीही जाळली आहे.

अटलांटा शहरातील CNN वाहिनीच्या समोर आंदोलकांनी शांतपणे आंदोलना सुरूवात झाली. सायंकाळी हे आंदोलन चांगलेच पेटले. सहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी ऑफिस बाहेर निदर्शनास सुरूवात केली. साडे सातच्या सुमारास आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीला आग लावली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आंदोलक थेट ऑफिसमध्ये घुसले आणि सामानाची नासधूस केली. यावेळी त्यांनी माध्यमविरोधी घोषणाही दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या