पुरुषांच्यात्वचेवर चमक आणण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय…

3074

सुंदर दिसण्यासाठी महिला आपल्या त्वचेची काळजी घेतात तसेच काही पुरुषही सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी घेतात. महिला सुंदर दिसण्यासाठी अनेक ब्युटी प्रोडक्ट,क्रिम,हर्बल फेसपॅकचा वापर करतात पण काही पुरुष ब्युटी प्रोडक्टपेक्षा घरगुती आयुर्वेदिक उत्पादन वापरायला पसंती देतात. पुरुषांच्या त्वजेवर तजेला येण्यासाठी काही घरगुती उपाय याप्रमाणे आहेत.

दही आणि मध यांचे मास्क
चेहऱ्यावर मध लाऊन त्याला 10 मिनीटे मसाज करत राहावे.त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यावा तुमचा चेहरा चमकू लागेल.तसेच मधासोबत दह्याचा वापरही करता येतो. मध आणि दह्याचे मिश्रण करुन चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळू लागेल.

मध आणि अंड्याचा मास्क
एक चमचा मध आणि अंड्याचा पिवळा भाग यांचे मिश्रण करुन यांमध्ये बदाम पावडर एकत्र करुन या सर्वांचे मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवावे.10 ते 15 मिनीटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा त्यानंतर  त्वचेत चमकदारपणा जाणवतो.

बेसन पावडर
 बेसन पीठ ही जुन्याकाळापासून प्रसिद्ध घरगुती फेसपॅक आहे. बेसन पीठामध्ये दूध,हळद,दही यांचें मिश्रण करुन पेस्ट तयार करुन घ्यावे व ती पेस्ट ला चेहऱ्यावर लावावी आणि काही मिनीटे चेहऱ्यावर मसाज करुन 15 मिनीटांपर्यंत तसेच ठेऊन चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

अंड,ताक आणि एलोवेरा जेल
तेलकट चेहऱ्याची समस्या अनेकजणांना असतो. एका भांड्यात अंड्याचा सफेद गर एलोवेरा आणि 1 ते 2 चमचे ताक यांचे मिश्रण करुन चेहऱ्यावर लावावे या घरगुती उपायामुळे चेहऱ्यावरचा तेलकटपणा निघून जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या